जापी ता. जि. धुळे येथील मरिमाता यात्रोत्सव

मला गावातील यात्रा फार आवडतात कारण यात्रे निमित्ताने सारा गाव एकत्र येतो, एकोप्याची भावना वाढते व सर्व ताण तणाव विसरून सर्व ग्रामस्त आनंद उत्सव साजरा करतात. आमच्या धुळ्यातील जापी गावची मरिमाता यात्रा हि नेहमी धूम धडाक्यात साजरा होते. मला काल या जत्रेत बोलवून जापी ग्रामस्तांनी जो मान दिला त्यासाठी मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. या निम्मिताने धुळे तालुका दूध उद्पादक संघाचे चैरमन गुणवंत देवरे, श्री पंढरीनाथ पाटील, श्री. के. पी. पाटील, जापिचे सरपंच दिपकभाऊ गुजर, माजी सरपंच प्रकाश गुजर, सतीश ठाकरे व जापी ग्रामस्त यांचाशी गावाच्या विकासा बाबत चर्चा झाली.