Slide background
Slide background
Slide background

युवक काँग्रेसचा झंझावात

कुणाल पाटील यांनी सन 1999 मध्ये श्रावण महिन्याचा मुहूर्त साधुन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करीत या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. या पहिल्याच मेळाव्याला हजारो तरुणांनी दिलेला प्रतिसाद पहाता त्यांनी मग कधी मागे वळून पाहिले नाही. युवक काँग्रेसच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्हयात झंझावात निर्माण केला. त्यांच्या कामाची पावती म्हणूनच त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली गेली अखिल भारतीय युवक काँग्रेसच्यावतीने त्यांना उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट डिस्ट्रीक प्रेसिडेन्ट या पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हयात युवक काँग्रेसच्या 300 ब्लॉक कमिटया स्थापन करण्याचा विक्रम त्यांनी केला. थोर नेत्यांची जयंती पुण्यतिथी असो किंवा सण उत्सवाच्या निमित्ताने होणारे प्रासंगिक कार्यक्रम या निमित्ताने काँग्रेसची विचार धारा तळागाळापर्यत पोहचविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे.

FB-like  माझ्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुक पेज लईक करा!

Kunal Patil