जीवनचरित्र

Kunal Patil

व्यक्तीगत माहिती

कुणाल रोहिदास पाटील.. जन्म 18 सप्टेंबर 1974.

शालेय व महाविदयालयीन शिक्षण मुंबईत पुर्ण केल्यानंतर मुंबई विदयापीठातून सन 1997 मध्ये अभियांत्रिकिची पदवी घेवून ते बाहेर पडले आपल्या गावाकडची प्रचंड ओढ आणि समाजकार्याच्या माध्यमातून  जनसेवा करण्याची धडपड त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने त्यांनीही राजकारणात सक्रीय सहभाग घेणे सुरु केले.

आजोबा आणि वडीलांनी उभारलेल्या शौक्षणिक संस्था, सहकाराच्या माध्यमातून विविध संस्थांचे विणलेले जाळे आणि यातून विस्तारलेला कामाचा व्याप सांभाळतांनाच कुणाल पाटील यांनी युवक काँग्रेसच्यामाध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करुन तरुणांची मोठी फळी निर्माण केली.

कौटुंबिक पाश्र्वभूमी

chudaman-patil

चुडामण आनंदा पाटील

माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या पेक्षा जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम करणारे चुडामण आनंदा पाटील यांनी स्वबळावर राजकारणात स्वत:ची भक्कम जागा निर्माण केली. काँग्रेसशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेले आण्णासाहेब चुडामण पाटील पहिल्यांदा 1957 मध्ये आमदार म्हणून निवडूण आले त्यानंतर 1962 ते 1977 असा दिर्घकाळ सलग तीन वेळा ते खासदार म्हणून निवडूण गेलेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्या हाती कायमच मशाल असे. मिल कामगारांची उभी केलेली चळवळ असो वा त्यांनी केलेला जंगल सत्याग्रह, स्वातंत्र्य लढयातील सक्रीय सहभाग आणि 1942 च्या चले जाव आंदोलनात दोन वर्ष भोगलेला तुरूंगवास असो, आण्णांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. राजकारणात असूनही तत्वांशी कधीही तडजोड न करणा-या आण्णांनी 1978 ला राजकारणातून निवृत्ती घेवून पुत्र दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्यावर धुरा सोपविली.

वडीलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी घेवून रोहिदास पाटील यांनी देखील राजकारणात दमदार पाऊल टाकले. धुळे तालुक्यातील मोहाडी प्र.ल. या गावाच्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदापासून राजकारणाला सुरुवात करीत असतांनाच पुढे कुसूंबा विधानसभा मतदारसंघाचे दिर्घकाळ नेतृत्व केले. तब्बल 22 वर्षे विविध खात्यांची मंत्री पदे खंबीरपणे सांभाळतांनाच महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र जागा निर्माण केली. राजकारणातील त्यांची सक्रीयता, जनमाणसाप्रती तळमळ आणि समाजसेवा आजही अखंडपणे सुरु आहे.

अशा कुटूंबात बाबासाहेब कुणाल पाटील यांचा जन्म झाला असून वडील रोहिदास पाटील यांच्या पावलांवर पाऊल ठेवून ते समाजकारण व राजकारणाचा वसा घेवून पुढे वारसा चालवित आहेत.